लिफ्टमध्ये अडकलेल्या जेष्ठाची सुटका

अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरूप सुटका

marathinews24.com

पुणे – मार्कटयार्ड येथील नंदनवन हॉटेल व लॉजिंग चार मजली इमारतीत मंगळवारी (दि.२७) राञी बारा वाजता दुसर्‍या मजल्यावर जेष्ठ नागरिक लिफ्ट बंद पडल्याने सुमारे अर्धा तास अडकल्याची वर्दि प्राप्त होताच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथील वाहन रवाना करण्यात आले होते.

कर्वेनगरमध्ये दुचाकीस्वाराच्या अंगावर झाड कोसळले, एकजण ठार, परिसरात वाहतूक कोंडी – सविस्तर बातमी

जवान घटनास्थळी पोहचताच प्रथम अडकलेल्या जेष्ठ नागरिकाशी संवाद साधत त्यांची लवकरच सुटका करू असा धीर देत वर लिफ्ट रूममधून काही जवानांनी मॅन्युअली फिरवत एकमेकांशी चर्चा करत लिफ्टमधून सदर जेष्ठ नागरिकाची पाचच मिनिटात सुखरूप सुटका करत आपले कर्तव्य बजावले.

अगदी वेळेत अग्निशमन दल पोहचत केलेल्या कामगिरीबद्दल जेष्ठ नागरिक हॉटेल मॅनेजर रवी कासेगावकर यांनी जवानांचे आभार मानले. कामगिरीत गंगाधाम अग्निशमन केंद्रातील तांडेल मनीष बोंबले, वाहनचालक प्रसाद शिंदे व जवान ज्ञानेश्वर कदम, अक्षय मोंढे, धनंजय भिसे, मंदार नलावडे, अजित टेकावडे यांनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×