Breking News
राज्यात पुणे जिल्ह्यात प्रथमच पहिल्या ‘महसूल लोक अदालत’ या अभिनव उपक्रमाचे चे आयोजन’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यातील तीन वाहतूक अमलदारांचे तडकाफडकी निलंबनमोबाइल हिसकावणार्‍या दोघांना अटक, विश्रामबाग पोलिसांची कामगिरीवादातून तरूणावर वार, मांजरी बुद्रूकमधील घटनावादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोडट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यूDevendra Fadnavis : सर्व शासकीय कार्यालयत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपिस्तूलाच्या धाकाने मारहाण करणार्‍याला अटक

   कोथरूडमध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत आढळली

कोथरूडमध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत आढळली, आत्महत्येचा संशय

marathinews24

पुणे – फ्लॅटमध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत आढळल्याचे कोथरूडमधील सोसायटीत दिसून आले आहे.  ७६ वर्षीय महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

कोथरुडमधील गुरूगणेशकृपा सोसासटी डि विंगमध्ये कमल घुगे भाडेतत्त्वावर राहायला होत्या. सोमवारी (दि.३१) सकाळी साडेआठच्या सुमारास रहिवांशांनी अग्निशमन दलाला फोन करून एका घरातून  धूर येत असल्याची माहिती दिली.  अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घुगे राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा जवानांनी उघडला. तेव्हा घुगे गंभीरिरत्या होरपळल्या अवस्थेत होत्या.  त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र,  उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, साहित्याला आग लागली नव्हती. घुगे एकट्या सदनिकेत राहायला होत्या. त्यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतली होती, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.  घुगे यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घुगे एकट्या सदनिकेत राहत होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top