Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

दुचाकी चालकाने धडक दिली, चाकाखाली सापडून जेष्ठ महिला ठार

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

कर्वे रस्त्यावरील हॉटेल जलसासमोर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे समोरील दुचाकीस्वारासह जेष्ठ महिला खाली पडली. त्याचवेळी शेजारून जाणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलरचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात ३ फेबु्रवारीला सकाळी सव्वा आठच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील हॉटेल जलसासमोर घडला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरूद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शेअर ट्रेडींगची गुंतवणूक महागात – सविस्तर बातमी 

सिताबाई आजिनाथ शिंदे (वय ६१, रा. कर्वेनगर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तुळशीदास शिंदे (वय ३८ रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तुळशीदास आणि त्यांची आई सिताबाई हे ३ फेबु्रवारीला दुचाकीवरून चालले होते. कर्वे रस्त्यावरील जलसा हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडल्यामुळे जखमी झाले. त्याचेवळी शेजारून जाणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलरचे चाक सिताबाईच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताला कारणीभूत दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×