अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कडे चोरून नेले. ही घटना ११ मे रोजी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास पुणे महापालिका बसस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी हिंजवडीत राहणार्या ६५ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडेक्स ट्रेडींगची हाव पडली २३ लाखांना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला पतीसोबत ११ मे रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकाजवळील पीएमपीएल बसस्थानकात थांबली होती. हिंजवडीला जाण्यासाठी बस आल्यानंतर दोघेही बसमध्ये प्रवेश करीत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ३० हजारांचे सोन्याचे कडे चोरून नेले. बसमध्ये शिरल्यानंतर महिलेला हातातील कडे नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बसमधून उतरून पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार बनकर तपास करीत आहेत.