Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

समाजाची सुरक्षितता हेच पोलिसांचे आद्यकर्तव्य – पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला

केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ठ अन्वेषण प्रदान पुरस्कार सोहळा संपन्न ११ अधिकार्‍यांचा गौरव

marathinews24.com

पुणे – समाजाची सुरक्षितता हेच पोलिसांचे आद्यकर्तव्य असून, त्यादृष्टीने आपण काम केले पाहिजे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गुन्ह्यांची उकल करणे, गंभीर गुन्ह्याचा युद्ध पातळीवर तपास करीत आरोपींना अटकाव करण्याची जबाबदारीही आपली आहे. दरम्यान, पुरस्कार हा सन्मान नसून, ती एक प्रेरणा आहे. त्यामुळे गुणवत्तेत सुधारणा होते, असे प्रतिपादन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले आहे.

पोलीस संशोधन केंद्रात आयोजित केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळ्यात शुक्ला बोलत होत्या. यावेळी अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.

३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

गुन्ह्याच्या तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट अन्वेषण पदक वितरित करण्यात येते. त्यानुसार २०२२ मध्ये राज्यातील ११ पुरस्कारप्राप्त अधिकार्‍यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थीमध्ये पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भास्करराव तोरडमल, सहायक निरीक्षक मनोज मोहन पवार, पोलीस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार, पोलीस अधीक्षक अशोक तानाजी वीरकर, उपविभागीय अधिकारी अजित भागवत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राणी तुकाराम काळे, पोलीस निरीक्षक दीपशिखा दीपक वारे, पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार नानासाहेब राउत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोदाप्पा वनकोटी, पोलीस निरीक्षक समीर सुरेश अहिरराव यांंचा समावेश आहे.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या, बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांकडून आधुनिक सामुग्रीचा वापर केला जात आहे. त्यासह खून, दरोडा, जबरी चोरी, महिलांवरील लैिंगक अत्याचार, अपहरण यासह गंभीर गुन्ह्याची उकल, तपास आधुनिक पद्धतीने केला जात आहे. दरम्यान, समाजात सुरक्षितता निर्माण करणे हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग असून, ते काम प्राधान्याने केले पाहिजे.

तसेच गुन्हे अन्वेषणसाठी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांचे विशेष कौतुक असून, त्यांना भविष्यातील कामाला शुभेच्छा आहेत. मात्र, पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, प्रेरणा आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर आयुक्त पंकज देशमुख, रोहिदासर पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक अलका देसाई यांनी केले. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे यांनी आभार मानले.

विमान दुर्घटनेबाबत ना दुखावटा, ना श्रद्धांजली

गुजरातमधील अहमदाबादमध्ये विमान कोसळून २४२ प्रवाशांसह तब्बल २९० जण ठार झाल्याची घटना गुरूवारी दि.१२ घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशभरात दुःखाची लाट आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी सर्व शासकीय, अशासकीय, राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र,  पुण्यात उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह कोणत्याही अधिकार्‍यासह नियोजनकर्त्यांनी विमान दुर्घटनेबाबत दुखवटा व्यक्त केला नाही. किंवा मृत्यूमुखी पडलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पित न केल्यामुळे पोलिसांवर सडकून टीका केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×