Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

एसटी प्रवासात महिलेचे ४ लाखांचे दागिने चोरीला

बेळगाव ते स्वारगेट एसटी स्थानक परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील तब्बल ४ लाख २९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ जूनला सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बेळगाव ते स्वारगेट एसटी स्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिंपळे गुरव परिसरात राहणार्‍या ४८ वर्षीय महिलेने स्वागरेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपळे गुरव परिसरात राहायला असून, ८ जूनला सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बेळगाव ते स्वारगेट असा एसटी प्रवास करीत होती. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या बँगेतील ४ लाख २९ हजारांचे दागिने चोरून नेले.

स्वारगेट परिसरात आल्यानंतर महिलेला दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पीएमपीएल बसस्थानकासह एसटी स्थानकात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याचे चोरीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×