पुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूण ठार

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

कात्रज परिसरातील घटना 

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी अज्ञात तरूण ठार झाला आहे. त्याची ओळख पटली नसून, आंबेगाव पोलिसांनी आरोपी टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ जूनला सकाळी सहाच्या सुमारास कात्रजमधील मौर्य हॉटेलसमोर घडली आहे. पोलीस अमलदार दत्तात्रय मेंगाळ यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

एसटी प्रवासात महिलेचे ४ लाखाचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत टेम्पो चालकाने बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पादचारी तरूणाला धडक दिली. संबंधित तरूणाची ओळख पटली नसून, अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळे उचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीराज थोरात तपास करीत आहेत.

दरम्यान, ११ जूनला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भरधाव ट्रकचालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार सहप्रवाशी महिला जागीच ठार झाल्याची घटना मार्वेâटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकात घडली आहे. त्यामुळे बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×