Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

केतन अग्रवाल यांच्या वाढदिवशी न्यायासाठी एल्गार; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी

वेळेत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करा; आरोपी सिया गोयलला जेलमध्ये कथित ‘व्ही.आय.पी. ट्रीटमेंट’ मिळत असल्याच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

marathinews24.com

पुणे – २६ ऑगस्ट रोजी कै. केतन अग्रवाल यांचा वाढदिवस आहे. जो दिवस कुटुंबियांसोबत आनंदाने साजरा व्हायला हवा होता, दुर्दैवाने केतन यांच्या निर्घृण हत्येमुळे आज त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना न्यायासाठी पत्रकार भवनात एकत्र यावे लागले आहे. केतन अग्रवाल यांची हत्या अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित कट होती. पोलिसांनी वेळेत तपास पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची आणि आरोपीच्या व्ही.आय.पी. ट्रीटमेंटच्या चौकशीची मागणी आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.

चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – सविस्तर बातमी

यावेळी रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे राहुल डंबाळे, अपर्णा दुबे, अॅड. जावेद जमादार, रुद्राणी जावळकर, कैलास देवकर, उषा आवळे, राहुल नागटिळक आदि उपस्थित होते.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला अटक करण्यात आली असली, तरी तिला जेलमध्ये बेकायदेशीरपणे ‘व्ही.आय.पी. ट्रीटमेंट’ (VIP Treatment) दिली जात असल्याचा दाट संशय आहे. पैशांच्या आणि प्रभावाच्या बळावर आरोपींना जेलमध्ये अशा सवलती मिळणे अत्यंत गंभीर असून, यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

वेळेत तपास आणि चार्जशिट: पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास कायदेशीर वेळेत (Time-bound) पूर्ण करावा आणि कोर्टात भक्कम पुराव्यांसह तातडीने दोषारोपपत्र (Charge-sheet) दाखल करावे.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला: केतन अग्रवाल यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावे, यासाठी हा खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ (Fast Track Court) चालवून तात्काळ निकाल लावण्यात यावा.

व्ही.आय.पी. ट्रीटमेंटची चौकशी: आरोपी सिया गोयल हिला जेलमध्ये मिळणाऱ्या विशेष सुविधांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी जेल अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

हा लढा केवळ केतन अग्रवाल यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाही, तर गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आहे. जोपर्यंत केतनच्या मारेकऱ्यांना कठोर फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरु राहील.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×