Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शिक्रापूरमध्ये गुंडाचा एन्काऊंटर

सातारामध्ये चाकूच्या धाकाने लुटले होते महिलेला

marathinews24.com

पुणे – सातारा शहरात पादचारी महिलांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आरोपींचा पाठलाग करताना पोलिसांनी त्यांना शिक्रापूर (जि. पुणे) परिसरात गाठले. चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चोरट्यांनी चाकू हल्ला केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुंडाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ३०) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर परिसरात घडली आहे.लखन पोपट भोसले (रा. वडगाव पुसावले, सातारा) असे एन्काऊंटर झालेल्या गुंडाचे नाव आहे.

महिलांची कपडे घालून कंपनीत केली चोरी – सविस्तर बातमी

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील आरोपींना अटक करण्यासाठी सातारा शहर पोलिसांचे पथक शिरूर आणि शिक्रापूर परिसरात शोध मोहिम राबवत होते. या मोहिमेदरम्यान मलटण फाटा, शिक्रापूर परिसरात आरोपी अमोल दौलप्पा केरे (रा. झेंडेश्वरी पायथा, आसगाव, सातारा) आणि लखन पोपट भोसले (रा. वडगाव पुसावले, सातारा) हे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला. भुजबळनगर, मलटण फाटा येथे आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी लखन भोसले याने पोलीस हवालदार सुजित भोसले यांच्यावर चाकूने वार केला. पोलिसाच्या छातीवर आणि हातावर वार केला. पोलीस तुषार भोसले यांच्याही हातावर वार केला.

हल्ल्यातून बचाव करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे आरोपी लखन भोसले गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शिक्रापूरमधील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपीला ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी लखन भोसले याला मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून हॉस्पिटल येथे रवाना केला आहे.दरम्यान, जखमी पोलिसांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×