Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुण्यात डॉक्टरही असुरक्षित

लोणी काळभोरमध्ये मद्यपीकडून रुग्णालयात तोडफोड

रुग्ण तपासणीच्या बहाण्याने डॉक्टरला लुटले

marathinews24.com

पुणे – रुग्ण तपासणी करण्याची बतावणी करुन डाॅक्टरला चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका सोसायटीच्या आवारात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या चाेरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ४९ वर्षीय डाॅक्टरांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यभागात वाहतूक कोंडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टरांचा खासगी दवाखाना आहे. ते कात्रज भागात राहायला आहेत. बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री नऊच्या सुमारास चोरटे त्यांच्या दवाखान्यात गेले. ‘एक रुग्ण अत्यवस्थ आहे. त्याची तपासणी करायची आहे’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरटे त्यांना घेऊन पुणे-सातारा रस्त्यावरील अथर्व परिहाज इमारतीच्या तळमजल्यावर घेऊन गेले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखविला. चोरट्याने त्यांच्या बोटावर चाकूने वार केला. चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने डाॅक्टरांकडील दुचाकीचा ताबा घेतला. डाॅक्टरांच्या पिशवीत ३० हजारांची रोकड, मोबाइल , एक लाख रुपयांचा चांदीचा जग असा मुद्देमाल होता. दुचाकी, मोबाइल, रोकड, चांदीचा जग असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.

घटनेनंतर घाबरलेल्या डाॅक्टरांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, सहायक निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. डाॅक्टरांनी दिलेल्या वर्णनानुसार चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक सद्दाम फकीर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×