नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यभागात वाहतूक कोंडी

नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य पुण्यात भाविकांची मोठी गर्दी

marathines24.com

पुणे – शहरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. शहर, तसेच उपनगरांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, तसेच परिसरात कोंडी झाली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहर, उपनगर तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आल्यानंतर लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता.

पुण्यात नववर्षाच्या रात्री २०८ मद्यपी वाहन चालक जाळ्यात – सविस्तर बातमी

बाजीराव रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी मोटारी नदीपात्रातील रस्त्यावर लावल्याने नदीपात्रातील रस्त्यावरील मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. मध्य भागातील गल्लीबोळांत अनेकांनी दुचाकी वाहने बेशिस्तपणे लावल्याने कोंडी झाली होती. भाविकांची गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिर, तसेच शहरातील विविध मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी झाली होती. वाहतूक नियोजनासाठी या भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. – हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×