प्रतिभावान जोडप्यांनी साकारलेल्या चित्रप्रदर्शनाला सुरुवात

संवाद, पुणे आणि आर्टवाला फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

marathinews24.com

पुणे – देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार व प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून संवाद, पुणे आणि आर्टवाला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावान जोडप्यांनी साकारलेल्या चित्रप्रदर्शनाला आज सुरुवात झाली. दि. १३ डिसेंबरपर्यत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कला दालनात आयोजित करण्यात आले आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027; बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस – सविस्तर बातमी

प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. ११) ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते झाले. माजी महापौर अंकुश काकडे, संवाद, पुणेचे सुनील महाजन, आर्टवाला फाऊंडेशनचे डॉ. गिरीश चरवड, संदीप भामकर, उत्तम साठे आदी उपस्थित होते. वर्षा खरतमल-रामचंद्र खरतमल, उत्तम साठे, सुरभी साठे, रमेश भोसले, शुभदा भोसले, अरविंद कोळपकर, हर्षदा कोळपकर, चेतन वैती-स्नेहल वैती, सुरेश गुलगे-कल्याणी गुलगे, मनोज शर्मा-पुष्पा शर्मा, सचिन कोलटकर-अर्पिंता कोलटकर तसेच मनोहर देसाई, शरयू फरकांडे, गिरीश चरवड यांच्या कलाकृती प्रदर्शनात आहेत.

समाजात अनेक दांपत्ये स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे कला, संस्कृती, विचार आणि सर्जन शीलतेद्वारे कार्यरत आहेत. त्यांचा एकत्रित कलाप्रवास, परस्परांना देणारा सृजनशील आधार, तसेच त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसणारी नाती, मूल्ये आणि अनुभूती या सर्वांचा संगम या प्रदर्शनाद्वारे पुणेकरांना पाहता येणार आहे.

मित्राची कॉलर आणिखी ताठ करतो

प्रदर्शनातील कलाकृतींचे कौतुक करून विठ्ठलशेठ मणियार म्हणाले, कलेचा रसिक या नात्याने वैविध्यपूर्ण कलाकृती समजून घेण्याचा प्रयत्न केला. मित्राची शिल्पकृती साकारावी असे मणियार यांना सांगण्यात आले तेंव्हा त्यांनी मित्राची कॉलर ताठ आहेच ती अधिक ताठ करतो, असे सांगून पवार आणि आपल्यातील मैत्रीचा धागा किती पक्का आहे हेच जणू दर्शविले. संवाद पुणेतर्फे राबविण्यात येत असलेले उपक्रम नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत, असे अंकुश काकडे म्हणाले.

प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कलाकार पती-पत्नीच्या कलाकृतींचे प्रदर्शन पहिल्यांदाच भरविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश चरवड यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×