Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना दिला जातो सहकार पुरस्कार 

marathinews24.com

पुणे – सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन २०२३-२४ चा पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. यासाठी यापूर्वी १८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास कळविण्यात आले होते. तथापि, सन २०२५ या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये अधिकाधिक सहकारी संस्थांना पुरस्कार मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करता यावेत यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत – सविस्तर बातमी  

जिल्ह्यातील इच्छुक सहकारी संस्थांनी सविस्तर प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत. सहकारी संस्थांनी पुरस्काराच्या अटी, निकष आदी अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच तालुक्याचे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक अथवा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, श्रीकृष्ण वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

देश-विदेशी पर्यटकांना शहरातही मिळणार टुरीस्ट होम

देश-विदेशातील पर्यटकांच्या निवास व्यवस्थेकरीता टुरीस्ट होम, होम स्टे, पर्यटन व्हिला, पर्यटक अपार्टमेंट या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची संधी पर्यटन संचालनालय पुणे विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक तसेच पर्यटक व्यावसायिकांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाच्या प्र. उपसंचालक शमा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

योजनेमुळे देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील जीवनशैली, संस्कृती अणि परंपरा जवळून अनुभवता येणार आहे. तसेच स्थानिक स्वयंपाक, मराठमोळे पाहुणचार व कुटुंबातील गप्पा गोष्टींमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक संस्मरणीय होईल. अधिक माहितीसाठी 8080035134 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top