हेल्मेटविना दुचाकी चालवाल तर कारवाईला सामोरे जा

नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आणि शिस्तभंगाची कारवाई

marathinews24.com

बीड (अनंत जाधव)- जिल्ह्यात वाढत असलेल्या दुचाकी अपघाती मृत्यूंच्या प्रमाणामुळे आता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी सावधान राहण्याचे निर्देश जो नागरिक किंवा शासकीय कार्यालयातील कर्मचारी असो किंवा अधिकारी यांनी जर हेल्मेटचा वापर न केल्यास कोणतीही तडजोड न करता थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर’निमित्त दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त – सविस्तर बातमी

प्रामुख्याने १९ जानेवारीपासून जिल्ह्यातल्या सर्व शासकीय- प्रशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर प्रवेशद्वारावर नाकाबंदी करून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीवरील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. ज्या कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती केली जाणार नाही त्या कार्यालयाच्या प्रमुखावरही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे .

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. दुचाकी अपघातांच्या विश्लेषणातून धक्कादायक बाब समोर आली असून, एकूण अपघाती मृत्यूंपैकी तब्बल ९० टक्के मृत्यू हे हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचा ‘रस्ते सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्ह्यात कडक अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ पासून बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, सर्व पोलीस ठाणे परिसर तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कारवाईत पोलीस अधिकारी-अंमलदार तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनाही सूट दिली जाणार नाही. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत व प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये १ अधिकारी व ५ अंमलदारांचे पथक नेमून ही मोहीम दररोज नियमितपणे राबविण्यात येणार आहे.

कर्तव्यात कसूर केल्यास थेट कारवाई

पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा ज्या शासकीय कार्यालयासमोर ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार नाही, त्या संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हेल्मेटविना दुचाकी चालवताना कोणताही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार आढळल्यास, त्यांच्यावर दंडासह शिस्तभंग विषयक कारवाई करून सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. तसेच इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांबाबतची माहिती संबंधित विभागप्रमुखांकडे पाठवून विभागीय कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×