बनावट गुटख्याचा कारखाना उध्वस्त, १ कोटींवर मुद्देमाल जप्त

बनावट गुटख्याचा कारखाना उध्वस्त, १ कोटींवर मुद्देमाल जप्त

थेउर फाटा परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – नामांकित गुटख्याची बनावट पद्धतीने निर्मिती करणारा कारखानाच अमली पदार्थ विरोधी पथक दोनने उध्वस्त केली आहे. लोणीकाळभोर परिसरातील थेउर फाटा परिसरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, तीन मोटारी, रोकड, गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, विमल गुटखा पान मसाला, कच्चा माल, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स, असा तब्बल १ कोटींचा ऐवज जप्त केला.

गोल्ड फॉरेक्स ट्रेडींगमधील गुंतवणूक पडली १९ लाखांना – सविस्तर बातमी 

कारखाना मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५ रा थेऊर ता. हवेली) रामप्रसाद ऊर्फ बापु बसंता प्रजापती (वय ५० रा. थेऊर गाव, पुणे मुळ उत्तरप्रदेश) अप्पु सुशिल सोनकर (वय ४६ मूळ- उत्तर प्रदेश) दानिश मुसाकीन खान ( वय १८ रा. थेऊर फाटा, मूळ-उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. सुमित गुप्ता हा फरार झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड हे ४ डिसेंबरला पथकासह पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी थेउर फाटा परिसरात असलेल्या कांबळे वस्तीवर गोदामात गुटख्याची निर्मिती होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोदामावर छापा टाकून बनावट गुटख्याची सुंगधीत तुंबाखू जप्त केली.

बनावट गुटखा वाहतुक करण्यासाठी मॉडिफाय केलेल्या तीन मोटारी, सव्वा लाखांची रोकड जप्त केली आहे. कंपनीचे मालक व कामगार यांच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३,२७४, २७५, अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६ नुसार लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पकंज देशमुख, अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

बनावट गुटख्याची निर्मिती करणारा कारखाना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने उध्वस्त केला आहे. त्याठिकाणाहून कच्चा माल, मोटारी, रोकड असा ऐवज जप्त केला आहे. तसेच कारखाना मालकासह कामगारांना ताब्यात घेतले असून, आणखी तपास केला जात आहे. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×