Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वडणेर येथील शेतकरी पदमाकर देशमुख यांचा ५एचपी सोलार पॅनल महापूराच्या पाण्यात गेला वाहून

पंचनामा केला मात्र आद्याप आर्थिक मदत नाही, आर्थिक मदत त्वरीत देण्यात यावी देशमुख यांनी प्रशासनाकडे केली मागणी

marathinews24.com

धाराशिव – परंडा तालुक्यातील वडणेर येथील शेतकरी पदमाकर बाबूराव देशमुख यांच्या शेत गट नं२१७ मधील बोरवेल वरील ५एचपी शक्ती कंपनीचे सोलार उल्फा/दुधना नदीला दि. २२सप्टेंबर रोजी आलेल्या महापूराच्या पाण्याने सोलार पॅनल उखडून पडून काही प्लेटा फुटल्या आहेत, तर काही प्लेटा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकरी पदमाकर देशमख यांचे आंदाजे ३ लाख ५० हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

बारामती तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न – सविस्तर बातमी

२१ व २२ सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यासह चांदणी, खवासापूरी, साकत मध्यम प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे उल्फा/दुधना नदिला महापुर आला होता. महापूराचे पाणी नदी काठच्या गावातील कुठूंबाच्या घरात गेल्याने सदर कुठूंबाच्या घरातील जिवनावश्यक साहीत, शेतकऱ्यांच्या शेतातील काही पीके पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली तर ऊसाचे पिक जमिनिवर आडवे झाले असून विहीरी गाळाने भरल्या आहेत. इलेक्ट्रीक मोटारी, पाईप, स्टाटर, बोर्ड महापूराच्या पाण्यात वाहून गेले आहे. तर वडणेर येथील शेतकरी पदमाकर बाबुराव देशमुख यांच्या शेती गट न.२१७ मधील सोलार पॅनल उखडून जमीनीवर पडल्यामुळे काही प्लेट फुटल्या आहेत तर काही प्लेट महापूराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.

पदमाकर देशमुख यांनी नुकसानीची आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसील कार्यालयाकडे केली होती त्यानुसार ग्राममहसूल अधिकारी आत्तार शेख यांनी दि. ३ ऑक्टोंबर रोजी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून तहसील कार्यालयाला आवाहाल सादर केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×