Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कल्याणीनगर भागात फ्लॅटमध्ये आग

वातानुकूलन यंत्रणेत स्फाेट

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगर भागातील एका सोसायटीतील सदनिकेतील गच्चीत बसविलेल्या वातानुकूलन यंत्रणेत स्फोट झाल्याने आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात – सविस्तर बातमी

कल्याणीनगर भागात स्काय लाऊंज ही सोसायटी आहे. या सोसायटीतील दहाव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत (टेरेस फ्लॅट) गच्चीत वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली आहे. गच्चीतील खोलीत दूरचित्रवाणी संच, फ्रीज, तसेच अन्य वस्तू होत्या. या खोलीला लागून असलेल्या अन्य खोल्यांमध्ये कुटुंब राहत हाते. दुपारी वातानुकूलन यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाला. त्या वेळी सदनिकेतील राहणारेे कुटुंब खालच्या मजल्यावर होते. स्फाेट झाल्यानंतर गच्चीवर खोलीत आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×