Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

कोथरूडमध्ये भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा मुद्देमाल चोरी

महिलेची २१ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने तिला सिंहगड रस्ता भागात बोलावले. पैसे परत करण्याचा बहाणा करुन पिशवीत लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा भरून दिल्या. नोटांची पिशवी महिलेला देऊन आरोपीला पसार झाला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोरखनाथ गावंडकर (रा. कडसुरे, जि. रायगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाची १ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय महिला सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरात राहायला आहे. गेल्या वर्षी महिलेने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. आरोपीने विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने विवाहाचे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात ओढले. आर्थिक अडचणीत असल्याची बतावणी करुन महिलेकडून वेळोवेळी २१ लाख रुपये घेतले. महिलेने पैसे करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने पैसे परत करतो, असे सांगून महिलेला सिंहगड रस्ता परिसरात भेटायला बोलाविले.

आरोपी आणि महिला एका हाॅटेलमध्ये भेटले. तेथे त्याने महिलेला लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा एका पिशवीत भरून दिला. महिलेने पिशवी उघडून पाहिली नाही. आरोपी तेथून पसार झाला. काही वेळानंतर महिलेने पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत खेळण्यातील नोटा भरून दिल्याचे उघडकीस आले. महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाणटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक कदम तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×