Breking News
पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकर

एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाची १ लाखांची फसवणूक

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने खात्यातून १ लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. खडकीतील ओैध रस्ता परिसरातील एका बँकेच्या एटीएमजवळ रविवारी ही घटना घडली. पसार झालेल्या चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कारवाई; ५ बांगलादेशी महिला ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४७ वर्षीय महिला ओैंध रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. त्यानंतर महिलेने मुलाला त्यांच्याकडील एटीएम कार्ड दिले. ‘अंत्यविधीसाठी पैसे लागतील. एटीएममधून पैसे काढून ये’, असे त्यांनी मुलाला सांगितले. त्यानंतर मुलगा सकाळी साडेनऊच्या सुमारास ओैंध रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम परिसरात गेला. एटीएमच्या परिसरात चोरटा थांबला होता. मुलगा एटीएममध्ये गेल्यानंतर चोरटा आत शिरला.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाकडे मदतीचा बहाणा केला. मुलाकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द (पासवर्ड) चोरट्याने घेतला. चोरट्याने एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा केला. पैसे निघत नसल्याची बतावणी मुलाकडे केली. चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड मुलाला दिले. चोरटा एटीएममधून बाहेर पडला. काही वेळानंतर मुलाच्या आईच्या बँक खात्यातून चोरट्याने टप्याटप्याने एक लाख रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, एटीएम परिससरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×