Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावले

फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावले

मुंढव्यातील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा भागातील बी. टी. कवडे रस्त्यावरील बहुमजली सोसायटीतील १७ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भीषण आग लागल्याची घटना बुधवारी घडली. आगीनंतर किचनमधील सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कुटूंब नोकरीनिमित्त बाहेर गेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आग इतरत्र नो पोहचू न देता अग्निशमन दलाने आगीवर नियत्रंण मिळविले.

पुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्या – सविस्तर बातमी 

सिलेंडरच्या स्फोटामुळे घरघुती साहित्य जळून खाक झाले, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमोद सोनवणे यांनी दिली. बी. टी. कवडे रस्त्यावर कोहिनूर रेसिडेन्सी ही बहुमजली इमारत आहे. सचित ननावरे यांचा १७ व्या मजल्यावर क्रमांक एकचा फ्लॅट आहे. सचित हे त्यांच्या पत्नी व मुलीसोबत राहण्यास आहेत. दरम्यान, दाम्पत्य नोकरी करते. तर मुलगी शाळेत शिकते. नेहमीप्रमाणे दोघेही नोकरी निमित्ताने बाहेर गेले होते. तर मुलगी शाळेत गेली होती.

दरम्यान, अचानक फ्लॅटमधून धूर येत असल्याची बाब सकाळी अकराच्या सुमारास समोर आली. नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दल तसेच पोलिसांना दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार फायर गाड्या तसेच तीन वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. आगीत घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे तर आग आणखीनच भडकली. लागलीच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा प्रचंड माराकरून ही आग इतरत्र पसरवू न देता ती काही वेळात आटोक्यात आणली. आग नेमकी का लागली हे समजू शकले नाही. घरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×