Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमी

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

पुण्यातील वारजे माळवाडीतील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

marathinews24.com

पुणे – ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून दोघांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास वारजेतील हेअर अ‍ॅडिक्ट केशकर्तनालयात झाली. दुकानात बसलेल्या दोघांवर आरोपीने गोळीबार तसेच कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ऐन गर्दीच्यावेळी गोळीबार घडल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली.

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरार – सविस्तर बातमी

गोळीबारात निहाल शिंदे आणि अमोल आढाव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साहिल राऊत या आरोपीला डीबी पथकाने गस्तीदरम्यान पकडले आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्यात यापूर्वी १७ वर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात राठ्या राठोड आरोपीला अटक केली होती. तपासादरम्यान त्याने अनेक अल्पवयीन मुलांना ड्रग्ज विक्रीसह तीन जणांकडून ड्रग्ज खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) यांना अटक केली होती.

यातील काही आरोपी अद्याप फरार असून, त्यापैकीच फरार आरोपीने शुक्रवारी रात्री वारजे परिसरात येऊन हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी वारजे पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×