Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत भरदिवसा घरफोडी

पाषाण परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना पाषाणमधील सुतारवाडी परिसरात घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुतारवाडी परिसरातील मुक्ता रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहेत. ७ जून रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले.

पुण्यात सुवर्ण भिशी योजनेत ४२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

तक्रारदार सोमवारी बाहेरगावाहून परतले असता, तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक महेश थिटे तपास करत आहेत. दरम्यान, उन्हाळी सुटीत अनेकजण सहकुटुंब बाहेरगावी जातात. चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरर्‍फोडी करत असल्याचे दिसून आले आहे. आठवडभरात घरफोडीचे सहा ते सात गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे बाहेरगावी जाण्याआधी आपल्या घराची सुरक्षितता महत्वाची असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×