Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

गणेशोत्सवाची भव्यता पाहून परदेशी पाहुणे भारावले

गणेशोत्सवाची भव्यता पाहून परदेशी पाहुणे भारावले

ग्लोबल गणेश फेस्टिवलमध्ये परदेशीसाठी दोन दिवस हेरिटेज वॉक

marathinews24.com

पुणे – शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणारे पेशवेकालीन त्रिशुंड गणपती मंदिर, ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन व इतिहास जाणून घेत, श्रीमंत भाऊ रंगारी भवनातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अनुभवतानाच श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासह पुण्याच्या गणेशोत्सवाची भव्यता पाहून परदेशी पाहुणे भारावून गेले. राष्ट्रप्रथम ट्रस्ट, सदैव फाउंडेशन व अमित फाटक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल गणेश फेस्टिव्हल अंतर्गत पुण्यात शिकणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादरीकरणाला मुदतवाढ – सविस्तर बातमी 

शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पर्यटन विभाग व सांस्कृतिक विभागाचे या महोत्सवाला विशेष सहकार्य लाभले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांसाठी हा हेरिटेज वॉक व गणपती दर्शनाचे आयोजन केले आहे. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, युगांडा, घाना, तुर्कीस्थान, कझाकिस्थान, भूतान, नेपाळ, म्यानमार आदी देशांतील जवळपास २०० नागरिक सहभागी झाले. पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, उपसंचालक शमा पवार, फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अनिरुद्ध येवले, समन्वयक महेश साने, कार्यकारी अधिकारी ऋषिकेश कायत, चिन्मय वाघ, त्रिशुंड गणपती मंडळाचे सचिन पवार, सोहम पवार उपस्थित होते.

पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर येथून सोमवारी दि.२९ दुपारी दोन वाजता हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. तत्पूर्वी याठिकाणी पारंपरिक पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. त्रिशुंड गणपतीचे दर्शन घेऊन मंदिराचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेतला. श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांच्यावतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली. इटली येथील अभिनेत्री एना मारा यांनीही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत लक्ष वेधून घेतले. टाळ्यांची उत्स्फूर्त दाद देत अनेकांनी हा अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यांत अन कॅमेरात साठवून घेतला. त्यानंतर ग्रामदैवत कसबा गणपतीचे उत्सव मंडपात दर्शन घेतल्यानंतर मूळ मंदिराविषयी माहिती घेतली. एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक पुनीत बालन यांनी परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन, तसेच ऐतिहासिक भाऊ रंगारी भवनाची माहिती घेत स्वातंत्र्य लढ्याची चळवळ जाणून घेतली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची भव्यता अनुभवत, गर्दीतून मार्ग काढत परदेशी विद्यार्थ्यांनी बाप्पाची आरती केली. गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मंडई ते स्वारगेट अशी मेट्रो सफारी घडवण्यात आली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. शुभारंभ लॉन्स येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने हेरिटेज वॉकची सांगता झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×