पुण्यात स्कॉर्पिओतून विदेशी दारू तस्करीचा भांडाफोड

लक्ष्मीनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

marathinews24.com

पुणे – स्कॉर्पिओ गाडीतून विदेशी दारूची तस्करीचा डाव लक्ष्मीनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी संबंधिताला येरवड्यातील सादलबाबा चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून गाडीसह तब्बल २ लाखांची विदेशी दारू, गाडी, मोबाइल असा मिळून २३ लाख ३१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. अंग्रेजसिंग पुरणसिंग गील (वय ३८ वर्ष रा. रामनगर बोपखेल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात बसप्रवासात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र चोरीला – सविस्तर बातमी

अवैध व्यावसायिकांविरूद्ध कठोर कारवाईच्या आदेशानुसार १४ एप्रिलला लक्ष्मीनगर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार भिमराव कांबळे, अमोल वायाळ यांना मोटारीतून विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, एसीपी सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सादलबाबा चौकात सापळा रचला. संशयित वाहन चालकाला अडवून त्याच्या वाहनाची (एम.एच.१४ एल.पी. ७४७४) तपासणी केली. त्यावेळी गाडीच्या डिकीत २ लाखांची विदेशी दारू, मोबाइल, असा २३ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला.

आरोपीने यापुर्वी अशाप्रकारे दारूची तस्करी केली आहे काय, त्याने विदेशी दारूचा साठा कोठून मिळवला, यामध्ये इतर आरोपींचा सहभाग आहे का, यादृष्टीने तपास केला जात असल्याची माहिती लक्ष्मीनगर पोलिसांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, एपीआय मिथुन सावंत, एपीआय रविकांत नंदनवार, दत्तात्रय शिंदे, सुरज ओंबासे, अमोल गायकवाड, कादिर शेख, राहुल परदेशी, अतुल जाधव, उगले यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×