पुण्यात बसप्रवासात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र चोरीला

बंडगार्डन पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील ९७ हजार रूपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना १२ एप्रिलला संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास भापकर चौक ते स्वारगेट ते ससून रूग्णालय प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी येरवड्यात राहणार्‍या ५६ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आयपीओ खरेदीच्या बहाण्याने पुण्यात सव्वा कोटींचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवड्यात राहायला असनू, १२ एप्रिलला संध्याकाळी सहाच्या सुमारास भापकर चौक ते ससून रूग्णालय असा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन अज्ञात चोरट्या महिलेने तक्रारदार महिलेच्या पर्समधील ९७ हजारांचे मंगळसूत्र चोरून पोबरा केला. पर्समध्ये मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूजा मदने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×