आयपीओ खरेदीच्या बहाण्याने पुण्यात सव्वा कोटींचा गंडा

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आयपीओ खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १ कोटी २२ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२५ कालावधीत केशवनगर, मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाह्यवळण मार्गावर तरुणाला धमकावून रोकड लुटली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंढव्यातील केशवनगरात राहायला असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅप गु्रपमध्ये समाविष्ट करून घेतले. त्याठिकाणी त्यांना स्टॉकची माहिती देउन अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. विविध आयपीओ खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना विविध बँकखात्यावर तब्बल १ कोटी २२ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

आरटीओ चलनाची फाईल पाठवून ४ लाखांवर गंडा

आरटीओ अधिकार्‍याने केलेल्या चलनाची फाईल व्हाटसअ‍ॅपवर पाठवून सायबर चोरट्यांनी तरूणाला ४ लाख २४ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना ९ जानेवारी २०२६ रोजी फुरसुंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×