Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बाह्यवळण मार्गावर तरुणाला धमकावून रोकड लुटली

 खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत

दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे -मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चार लाख रुपयांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना मुंबई – बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत रोहन रवींद्र कांबळे (वय ३१, रा. इंदू निवास, काळेवाडी,पिंपरी-चिंचवड ) याने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेत गोंधळ घालून व्यवस्थापकाला शिवीगाळ – सविस्तर बातमी 

रोहन एका मद्य विक्री दुकानात कामाला आहे. मद्य विक्री दुकानात जमा झालेली तीन लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन तो १२ एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मालकांच्या घरी देण्यासाठी निघाला होता.मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात दुचाकीस्वार कांबळे याला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखविला. त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन ३ लाख ९९ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेनंतर कांबळेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी बाह्यवळण मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक लिटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×