Breking News
राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या मुलासह व्याहीविरूद्ध गुन्हा दाखलरास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येचताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणीसफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणीडी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजीनीलेश चव्हाण याला पकडल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोनमुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावावाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधीपुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरला

गॅस सिलिंडरचा स्फोटात कुटुंबातील चौघे जखमी

गॅस सिलिंडरचा स्फोटात कुटुंबातील चौघे जखमी

दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक; महंमदवाडीतील घटना

marathinews24.com

पुणे – स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाल्याची घटना हडपसर भागातील महंमदवाडीत घडली. जखमी दाम्पत्यासह त्यांच्या मुलांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसंनी दिली. टेकचंदसिंग चौहान (वय ४२), बेबी टेकचंदसिंग चौहान (वय ३८), कशिश टेकचंदसिंग चौहान (वय १८), निखिल टेकचंदसिंग चौव्हाण वय १५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

विवाह समारंभात पाटाखाली लिंबे सापडल्याने विवाहितेचा छळ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील असून, आठ दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. महमंदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा भागात अजय परदेशी यांची खोली भाड्याने ते राहत होते. कामाच्या शोधात चौहान कुटुंबीय पुण्यात आले होते. चौहान कुटुंबीय गाढ झोपेत होते. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास सिलिंडरमधून गळती सुरू झाली आणि स्फोट झाला. स्फोटाच्या हादर्‍यात खिडकीच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर लागलेल्या आगीत टेबल आणि कपडे जळाली.

स्फोटात चौहान कुटुंबीय होरपळे. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजार्‍यांनी धाव घेतली. अग्निशमन दल, काळेपडळ पोलिसांना घटनेची माहिती कळविली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटात जखमी झालेल्या चौहान कुटुंबीयांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चौहान कुटुंबीय कामाचा शोधात आले होते पुण्यात

चौहान कुटुंबीय कामाच्या शोधात काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. बुधवारी पहाटे गॅसचा वास येत असल्याने चौहान यांनी लायटर लावले. त्या वेळी सिलिंडरचा स्फोट झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा शेगडीचा बर्नर सुरू असल्याचे आढळून आले.

ओैंधमध्ये सदनिकेत आग; तरुण जखमी

ओैंध गावातील सदनिकेत आग लागून तरुण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ओैंध गावातील गुरुद्वाराजवळ जुनवणे रेसीडन्सी आहे. इमारतीतील सदनिकेत बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदनिकेत दत्तात्रय किसन भंडलकर (वय ३८) हे पेटलेल्या अवस्थेत होते. जवानांनी तातडीने भंडलकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सदनिकेतील स्वयंपाक घर, शयनगृहातील साहित्य जळाले होते. जवानंनी सदनिकेतून दोन सिलिंडर बाहेर काढले. सिलिंडरमधून गळती होत असल्याचे निदर्शनास आले. जवानांनी गळती रोखली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top