नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा, पावणेपाच लाखांची फसवणूक

नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा, पावणेपाच लाखांची फसवणूक

माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नवीन क्रेडीट कार्ड देण्याच्या बहाणा करीत सायबर चोरट्यांनी ५० वर्षीय नागरिकाला एपीके फाईल पाठवली. त्यानंतर संबंधित फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ७३ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतले. ही घटना १८ जुलै २०२५ मध्ये कोथरूडध्ये घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद, दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, १८ जुलै २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. नवीन क्रेडीट कार्ड देण्याची बतावणी करीत एपीके फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानुसार तक्रारदाराने फाईल डाउनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वर्ग करून घेतली. जवळपास पावणेपाच लाख रूपये खात्यातून कमी झाल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×