कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून फसवणूक

marathinews24.com

पुणे – दहशतवाद्यांना पैसे देण्यासाठी बँक खात्याचा वापर झाला असून, याप्रकरणात अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पाेलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पुण्यात कॉलेज तरुणीचा विनयभंग ; भररस्त्यात पकडला हात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. दहशतवादी कारवाईत बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात येणार असून, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला दाखविली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चाेरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १८ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×