Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाची फस‌वणूक

भारती विद्यापीठ भागातील घटना

marathinews24.com

पुणे – पादचारी ज्येष्ठ नागिरकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना भारती विद्यापीठ भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दसऱ्यानिमित्त ३० फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी भागात राहायला आहेत. १ ऑक्टोबर रोजी ते दुपारी दोनच्या सुमारास भारती विद्यापीठ भागातून निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘आम्हाला सूतक आहे. जवळच्या मंदिरात दान करायचे आहे.’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी बोलण्यात गुंतवून ज्येष्ठाकडील अंगठी काढून घेतली. त्यांच्याकडील अंगठी चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×