नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी मारला डल्ला
marathinews24.com
पुणे – शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला १० लाख ८६ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ कालावधीत कात्रजमध्ये घडली आहे. याप्रकरणी कात्रजमध्ये राहणार्या ३६ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने १ कोटी ३४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रजमध्ये राहायला असून, १० नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी तिच्या मोबाइलवर लिंक पाठवली. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. विश्वास निर्माण झाल्यानंतर महिलेने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. १० लाख ८६ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग केले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे तपास करीत आहेत.
























