शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बतावणीने गंडा

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ लाखांची फसवणूक

४६ लाखांचा घातला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ४६ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १५ मे ते ३१ जुलै २०२५ कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय नागरिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उसने घेतलेले पैसे मागितल्याने केली मारहाण – सविस्तर बातमी `

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खराडीत राहायला असून, १५ मे २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत संपर्क साधला होता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली होती. त्यानुसार विश्वास बसल्यामुळे तक्रारदाराने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघ्या तीन महिन्यांत ४६ लाख रूपये गुंतवणूक केल्यानंतरही सायबर चोरट्यांकडून त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×