उसने घेतलेले पैसे मागितल्याने केली मारहाण

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

धमकी देणार्‍याला उत्तमनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – हातउसने घेतलेले पैसे माघारी मागितल्याच्या रागातून तरूणाला बेदम मारहाण करीत हत्याराच्या धाकाने धमकी देणार्‍याला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ११ मार्चला रात्री आठच्या सुमारास कोपरे गावात घडली आहे. शुभम पांडुरंग जाधव वय २४ रा. भैरवनाथनगर, कोंढवे-धावडे असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय तरूणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिवीगाळ केल्याच्या वादातून वार, तिघांविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोपरे गावात राहायला असून, त्यांनी काही दिवसांपुर्वी ओळखीतील एकाला हातउसने पैसे दिले होते. ११ मार्चला ते संबंधिताच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले असता, आरोपीने त्यांना पैशांची मागणी का करता अशी विचारणा केली. त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत लोखंडी हत्यार दाखवून धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी संबंधित शुभम जाधव याला अटक केली. पोलीस अमलदार कुंभार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×