शिवीगाळ केल्याच्या वादातून वार, तिघांविरूद्ध गुन्हा

शिवीगाळ केल्याच्या वादातून वार, तिघांविरूद्ध गुन्हा

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शिवीगाळ केल्याच्या वादातून टोळक्याने तरूणावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना १२ मार्चला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील रायसोनी कॉलेज गेटजवळ घडली आहे. याप्रकरणी मंगेश सांगळे याच्यासह साथीदारांविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश बबनराव भोसले (वय २२ रा. वाघोली, मूळ- अंबड जालना) नागेश सुनील जगताप अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

थेउररोड परिसरात घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिद्धेश आणि त्याचा मित्र नागेश हे १२ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास अखंड अमृततुल्या चहा याठिकाणी चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी मंगेश सांगळे हा त्याठिकाणी साथीदारांसोबत आला. त्याने नागेशकडे शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. त्यानंतर इतर आरोपींनी नागेशच्या पाठीवर, डोक्यात वार करून गंभीररित्या जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणार्‍या सिद्धेशला मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×