थेउररोड परिसरात घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज चोरीला

बालेवाडी, मुंढव्यातून साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

११ मार्चला दुपारी पावणेदोनच्या सुमारास थेउररोड परिसरातील कांबळे वस्तीवर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून २ लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ११ मार्चला दुपारी पावणेदोनच्या सुमारास थेउररोड परिसरातील कांबळे वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी तरूणाने लोणी काळभोर पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात डंपरच्या धडकेत पादचारी तरूण ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे थेउररोड परिसरातील कांबळे वस्तीवर राहायला आहेत. ११ मार्चला भरदिवसा चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील २५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. बाहेरहून आल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×