Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पुण्यात डंपरच्या धडकेत पादचारी तरूण ठार

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

धायरी फाटा परिसरातील गणेश मंगल कार्यालयाजवळ घडली होती घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपर चालकाने दिलेल्या धडकेत गंभीररित्या जखमी झालेला पादचारी तरूण ठार झाला आहे. ही घटना २८ फेबु्रवारीला सकाळी सव्वा नउच्या सुमारास धायरी फाटा परिसरातील गणेश मंगल कार्यालयाजवळ घडली होती. बजरंग विश्वभंर येवते (वय ३४, रा. नांदेडगाव, पुणे) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रावसाहेब येवते (वय २८ रा. निलंगा, लातूर) यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा अपघात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग येवते हे मूळचे निलंगा तालुक्यातील असून कामानिमित्त नांदेडगावात राहायला होते. २८ फेबु्रवारीला सकाळी नउच्या सुमारास ते पायी रोडच्या बाजूने जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपर चालकाने त्यांना गंभीररित्या जखमी केले. उपचारादरम्यान नुकतेच त्यांचे निधन झाले. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलीस अमलदार राहूल गायकवाड तपास करीत आहेत.

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ ठार

रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना ५ मार्चला दुपारी अकराच्या सुमारास कोंढवा फायरब्रिगेडजवळ घडली आहे. मुखत्तार अहमद मेहबूबसाहेब शेख (वय ६५ रा. कोंढवा) असे ठार झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद मुखत्तार अहमद शेख (वय ३४ रा. वडगाव शेरी ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×