Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

विमाननगर भागातील संस्थेतील दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमाननगर भागातील एका संस्थेतील समुपदेशकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका खासगी संस्थेतील समुपदेशकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींना वैद्यकीय अभ्यासक्रमास (एमबीबीएस) प्रवेश हवा होता. याबाबत त्यांनी चौकशी केली. विमाननगर भागातील एका संस्थेत ते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आले होते. संबंधित संस्थेतील समुपदेशकाने दोन्ही मुलींना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने त्यांच्या दोन्ही मुलींच्या बँक खात्यातून संबंधित संस्थेच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा केले.

पैसे जमा केल्यानंतर त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यात आला नाही, तसेच पैसे परत करण्यात टाळाटाळ करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गुंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×