Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने गंडा

फेसबुकद्वारे पाठवली लिंक, जेष्ठाला ३७ लाखांचा गंडा

जेष्ठाची ९ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठाला तब्बल ८ लाख ७७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १८ एप्रिल ते ८ जुलै कालावधीत मगरपट्टा रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६९ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीएमपीएल बसमध्ये शिरताना जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मगरपट्टा रस्ता परिसरात राहायला आहेत. १८ एप्रिलला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला जाळ्यात अडकवून गुंतवणूकीला भाग पाडले. जवळपास ९ लाख रूपये गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

पार्सलमध्ये ड्रग्जच्या बतावणीने गंडा

पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने महिलेला त्यांच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याची बतावणी केली. संबंधिताने महिलेला अटक करण्याची भीती दाखवून ७ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडले आहे. ही घटना ७ ते ९ ऑक्टोबर कालावधीत येरवड्यात घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×