Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

विद्यार्थिनींना मोफत ‘सायकल बँक’ लोकार्पण सोहळा उत्साहात

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १११ विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण

marathinews24.com

पुणे – ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. या प्रवासामुळे त्यांची शालेय हजेरी कमी होते तसेच शिक्षणात अडथळे निर्माण होतात. या समस्येवर मात करून मुलींच्या शिक्षणात गती यावी, शाळेत नियमित उपस्थिती वाढावी आणि प्रवासाचा त्रास कमी व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांच्यावतीने ‘सायकल बँक’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शिवरायांचे दुर्गवैभव आता जागतिक वारसा – सविस्तर बातमी

उपक्रमाचा लोकार्पण सोहळा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते इंदापूर येथे संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुक्यातील पाचवी ते आठवी वर्गातील १११ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करीत होते.

कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले की, “पुणे जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ‘सायकल बँक’ ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारी आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सोपे होईल, प्रवासाचा त्रास कमी होईल आणि नियमित हजेरीत वाढ होईल. शिक्षणाच्या प्रवाहात कोणतीही मुलगी मागे राहू नये, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. पुढेही जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.”

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती इंदापूरचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक संधींना नवी दिशा मिळणार असून, सायकल ही केवळ प्रवासाचे साधन न राहता शिक्षणाची गती वाढविणारे माध्यम ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×