तिघांना अटक, चंदननगर पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – मित्राचा गळा आवळून त्याला ठार मारल्याचे पोस्टमॉटर्म रिपोर्टवरून उघडकीस आले आहे. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनी खूनाला वाचा फुटली असून, याप्रकरणी तिघाजणांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना १४ ते १५ मार्चला चंदननगरमधील पठारे वस्तीवरील ओयो स्टार हॉटेलमध्ये घडली होती. आकाश सुनील साबळे (वय ३० रा. नागपाल रोड, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पुणे : अवैध वाळू उपसा करणार्या सराईताविरूद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी
शशिकांत मच्छिंद्र घोरपडे (वय ३४ रा. खुळेवाडी), रोहित आनंद मोरे (वय २३ रा. ताउजीनगर, वडगाव शेरी ) आणि यश रघुनाथ डांगे (वय २१, रा. शुभंकर पार्क, केसनंद थेउर रोड कोलवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश साबळे आणि आरोपी १४ ते १५ मार्चला चंदननगरमधील ओयो स्टार हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. त्याच रागातून टोळक्याने आकाशचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशी अहवालासह पोस्टमॉर्टम रिपोट, केमीकल तपासणीवरून आकाशचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यादिवशी सोबत असलेल्या तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पोलीस निरीक्षक स्वाती खेडेकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.