Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

तब्बल १५ फूट मोदक प्रतिकृतींसह गणेश चतुर्थी साजरी

तब्बल १५ फूट मोदक प्रतिकृतींसह गणेश चतुर्थी साजरी

१ हजारांहून अधिक बाटल्यांनी साकारलेली मोदक प्रतिकृती

marathinews24.com

पुणे – जेमिनी सनफ्लॉवर ऑइलच्या १ हजार पेक्षा अधिक बाटल्यांनी तयार केलेली १५ फूट उंच देखणी मोदकाची प्रतिकृती उत्सवी आनंदात भर घालत आहे. ती भरभराट, नावीन्यपूर्णतेचे प्रतीक ठरली असून,परंपरेचा गौरव करणारी आहे. गणेश चतुर्थीला मागील चार दशकांहून अधिक काळ सर्वात विश्वासार्ह खाद्यतेल ब्रँडपैकी असलेल्या जेमिनी कुकिंग ऑइलने जेमिनी सनफ्लॉवर ऑइलच्या १ हजार हून अधिक बाटल्या वापरून तयार केलेल्या १५ फूट उंचीच्या नेत्रदीपक मोदकांच्या प्रतिकृतीने भाविकांना आनंद दिला आहे.

समतेचा वडापाव, अखिल जनवाडी गणेशोत्सव मंडळाचा जिवंत देखावा – सविस्तर बातमी 

मुंबई, पुणे आणि नागपूरमधील प्रमुख मंडपांमध्ये प्रदर्शित केलेले हे मोदक समृद्धी, भरभराट आणि उत्सवाच्या आनंदाचे प्रतीक बनले आहेत. कारगिल फूड दक्षिण आशियाचे बी२सी प्रमुख शैलेश खुराना म्हणाले: जेमिनी कायमच स्वयंपाक घरांमध्ये विश्वास आणि गुणवत्तेसाठी महत्त्वाची ठरली आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही हा ब्रँड घरांबाहेर आणि राज्यातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक उत्सवाच्या केंद्रस्थानी घेऊन जात आहोत. मोदकांची प्रतिकृती स्थापित करण्याची भूमिका आणि आमचे समाजकेंद्री उपक्रम जेमिनीचे परंपरा, संस्कृती आणि सेवा देत असलेल्या समुदायांशी असलेले नाते जिवंत करतात. जेमिनी ब्रँड मोहिमेनुसार मुंबईतील सर्वात मोठे मोदक म्हणून ओळखले जाणारे हे मोदक आधीच उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि चर्चा निर्माण करत आहेत. सोशल मीडियावरील टीझर आणि प्रत्यक्ष चर्चा यामुळे हे मोदक यंदाच्या सर्वांत खास आकर्षणांपैकी एक बनत असल्याने जेमिनीने महाराष्ट्रात निवडक बाह्य आणि डिजिटल टच पॉइंट्सद्वारे व्यापक दृश्यमानता निर्माण केली आहे. त्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

उत्सवाचा एक भाग म्हणून जेमिनी सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला गटांचाही गौरव करत आहे. निवडक मंडपांमध्ये भक्ती संगीत आणि उत्सवांच्या विधींमध्ये योगदान दिल्याबद्दल समुदायातील महिलांचा सत्कार केला. जेमिनी कुकिंग ऑइल मागच्या ४० वर्षांहून अधिक काळापासून पश्चिम भारतात घराघरात लोकप्रिय नाव आहे. ते त्याची गुणवत्ता आणि प्रामाणिकपणासाठी सातत्याने ओळखले जाते. जेमिनी सनफ्लॉवर ऑइलला अलीकडेच कंझ्युमर व्हॉइसने भारतातील नंबर वन दर्जेदार करडई तेल ब्रँड म्हणून स्थान दिले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×