देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेशभक्तांना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा
marathinews24.com
मुंबई – गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यासह, देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत. बाल पणापासून बाप्पाशी असंख्य आठवणी जोडलेल्या असतात. आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची हिंमत, यश मिळवण्याची शक्ती आणि मानसिक शांतता हीच बाप्पाची खरी देणगी आहे. गणेशोत्सवात बाप्पाने सर्वांना निरोगी आरोग्य, आनंद, समृद्धी आणि शांत मनाचा आशीर्वाद द्यावा, हीच प्रार्थना आहे, अशा शब्दांत गोऱ्हे यांनी शुभकामना व्यक्त केल्या आहेत.
आला बाप्पाचा रथ मला नाचू दे; गाण्यावर तरूणाई थीरकणार – सविस्तर बातमी
हरितालिका पूजेविषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “या दिवशी महिला शंकर-पार्वतीची आठवण ठेवून उपवास आणि तपश्चर्या करतात. हे व्रत केवळ वैयक्तिक नसून कुटुंब, समाज आणि संपूर्ण जीवनाच्या प्रगतीसाठी असते. महिलांनी जशी या व्रताची जाण ठेवली आहे, तशीच पुरुषांनीही त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. मात्र उपवास करताना महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच गौरीमातेचे आगमन हे समृद्धी, ऐक्य आणि मंगल वातावरण निर्माण करणारे असते. या निमित्ताने प्रत्येक घरात भक्ती, प्रेम आणि आपुलकीने सण साजरा होतो. भगिनीभाव आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. दरम्यान, गणेशोत्सव हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक एकोपा, कौटुंबिक बंध, महिलांची तपश्चर्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारा एक महान उत्सव आहे, असेही त्यांनी सांगितले.























