Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

डेटिंग अँपद्वारे तरुणांना लुटणाऱ्या टोळीला अटक

कोंढवा पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – समलिंगी डेटिंग अँपद्वारे नागरिकांना संपर्क करून बोलावून घेत लुटमार करणार्‍या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तीन मोबाईल, कोयत, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. रोहील अकिल शेख (वय १९, रा. कोंढवा) नुहान नईम शेख (वय १८ रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) शाहिद शाहनुर मोमीन (वय २५ रा. संतोषनगर, कात्रज ) ईशान निसार शेख (वय २५ रा. अंजलीनगर,कात्रज ) वाहीद दस्तगीर शेख ( वय १८ रा कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास – सविस्तर बातमी

समलिंगी अ‍ॅपवरुन संपर्क करुन टोळीने तक्रारदार तरूणाला डेटिंगसाठी ११ जानेवारीला बोलावून घेतले. त्याठिकाणी त्याला शस्त्राचा धाक दाखवुन मोबाईल, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएममधील रक्कम काढून घेतले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आरोपीचा शोध घेताना सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल नंबरवरुन आरोपीची नावे निष्पन्न झाली. अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना आरोपींची माहिती मिळाली.

आरोपी हे ए. जे. कंपनीजवळ असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेतली. पाचजणांना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गावडे निलेश देसाई, गोरखनाथ चिनकेपुष्पेंद्र चव्हाण, रशिद शेख, सुहास मोरे, अमित सुर्यवंशी, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, रियाज पटेल, केशव हिरवे, शाहिद राजपुत, प्रशांत खाडे, राहूल शेलार यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×