Breking News
Seva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणा

कोंढव्यात टोळक्याची दहशत- तरुणावर कोयत्याने वार

बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रोकड लांबवून नोकर पसार

सात जणांना केली अटक 

marathinews24.com

पुणे – कोंढव्यात टोळक्याची दहशत- तरुणावर कोयत्याने वार – कोयते उगारून टाेळक्याने दहशत माजविल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने एका वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार केले. दहशत माजविणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सात जणांना अटक केली. याप्रकरणी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. तन्वीर अक्रम शेख (वय १९), सुरेंद्र उर्फ अमर भुवनेश्वर साव (वय १९), राजू उर्फ राजा संगप्पा गुळकर (वय १८), कैलास बाबुराव गायकवाड (वय २२), कवीराज उर्फ केडी सुदाम देवकाते (वय १९), प्रेम उर्फ पप्या यल्लेश घुंगरनी (वय २२), यश अंबर सोनटक्के (वय १८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर राहायला आहेत. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर, वाकडेवाडी परिसरातून आठ लाखांचे अमली पदार्थ जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा आरोपींशी वाद झाला होता. ११ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास तो कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर भागात गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली, असून त्यांच्याबरोबर अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करत आहेत.

उधारीवर सिगारेट न दिल्याने जिवे मारण्याची धमकी

उधारीवर सिगोरट न दिल्याने दोघांनी दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गमेश कांबळे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका किराणा माल दुकानादारने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे उत्तमनगर भागात किराणा माल विक्री दुकान आहे. आरोपी ११ जुलै रोजी दुपारी दुकानात आले. त्यांनी किराणा माल दुकानदाराकडे उधारीवर सिगारेट मागितली. उधारीवर सिगारेट न दिल्याने आरोपींनी दुकानदाराच्या गाळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रोकड लुटून आरोपी पसार झाले. घाबरलेल्या दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×