Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

घोरपडे पेठेतील घरातून ५५ हजारांचा ऐवज चोरीला

घोरपडे पेठेतील घरातून ५५ हजारांचा ऐवज चोरीला

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन हजारांची रोकड आणि सोने-चांदी असा मिळून ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १५ सप्टेंबरला सकाळी सात ते पावणेआठच्या सुमारास घोरपडे पेठेतील सहारा कॉम्प्लेक्स, मॉडर्न कॉर्नर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून ३ लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे घोरपडे पेठेत राहायला असून, १५ सप्टेंबरला सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या घरात शिरून दोन हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चोरीची माहिती मिळताच तक्रारदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार एम.आर. येलपले तपास करीत आहेत.

पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात महिलांचे दागिने चोरीला; चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय

पुणे – नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएल बसमध्ये प्रवास करणार्‍या महिलांना टारगेट करून त्यांच्याकडील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषतः गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांकडून गलका करीत महिलांना घाबरवून त्यांचे दागिने हिसकावून नेले जात आहे. मागील काही दिवसांपासून मध्यवर्ती स्वारगेट, शिवाजीनगर परिसरात टोळी सक्रिय झाल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ११ सप्टेंबरला सकाळी अकराच्या सुमारास महाराजा प्रताप उद्यानपासून ते सेवासदन चौकादरम्यान घडली आहे. याप्रकरणी खडकमाळ परिसरातील राष्ट्रभुषण चौकात राहणार्‍या ५५ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अमलदार गोंजारी तपास करीत आहेत.

बसमधून खाली उतरत असताना चोरट्याने एका महिलेला मदतीचा बहाणा करीत त्यांच्या हातातील ३१ हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना १५ सप्टेंबरला संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास महानगरपालिका बसस्थानक शिवाजीनगर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी शिरूरमध्ये राहणार्‍या ५६ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार रोमाडे तपास करीत आहेत.

चोरट्यांची टोळी सक्रिय, प्रशासन निष्क्रिय

शहरातील पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलांसह गावाहून आलेल्या महिलांना लक्ष्य करीत चोरट्यांकडून दागिने चोरून नेले जात आहेत. मागील काही दिवसांपासून संबंधित टोळीने धुडगूस घातला असून, पीएमपीएल प्रशासनासह पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे त्यांचे फावले आहे. दरदिवसाआड दागिने चोरून नेण्याच्या घटना प्रवासादरम्यान घडत असल्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×