Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुंडाला अटक

कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुंडाला अटक

गुंड ठाणे जिल्ह्यातून घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी नीलेश घायवळ टोळीतील सराइताला खंडणी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातून अटक केली. जयेश कृष्णा वाघ (वय ३६, रा. विठ्ठल मंदिरासमोर, केळेवाडी, कोथरूड) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.

पुण्यात दृश्यम स्टाईल केला पत्नीचा खून – सविस्तर बातमी 

घायवळ टोळीतील गुंड वाघ याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. पसार झालेल्या वाघ याचा शोध घेण्यात येत होता. वाघ हा ठाणे जिल्ह्यातील टिट‌वाळा परिसरात असलेल्या कोंडारी गावात वास्तव्यास असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोंडारी गावात लपलेल्या वाघ याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस कर्मचारी अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमर पवार, नितीन बोराटे, अविनाश कोंडे, बबलू मांढरे, नागनाथ राख यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×