Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

“आयुर्वेद-युनानी महाविद्यालयांना शासनमान्य सेवा नियम लागू करावेत”

दि.१५ एप्रिल २०२६ *नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी उद्यापासून संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधेयकाचे जोरदार स्वागत; “३० वर्षांची प्रतीक्षा संपली, महिलांना समान संधी मिळणार”* मुंबई.दि.१५: नारी शक्ती वंदन अधिनियम २०२३ (महिला आरक्षण विधेयक) च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर संसदेत उद्यापासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या संदर्भात आज विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘नारी शक्ति वंदन अधिनियम २०२३’ या विषयावर मुंबई येथील पुरंदर निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “१९९८ मध्ये पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक रद्द झाले होते. त्यानंतर २००८ आणि २०१० मध्ये राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. त्यावेळी लोकसभेत विरोधक कागद फाडून टाकत असल्याने ऑनलाइन बिल सादर करण्यात आले. २०१४ मध्ये १५ व्या लोकसभेचा कालावधी संपल्याने ते विधेयक व्यपगत झाले मात्र नवीन लोकसभेत २०२३ मध्ये त्याला पुनर्जीवन मिळाले आणि ते मंजूर झाले.” *जनगणना आणि पुनर्रचनेची सांगड* डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “सध्याच्या विधेयकात जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेची तरतूद होती. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात ही अट वगळण्यात येणार आहे. ही १३१ वी घटनादुरुस्ती असेल. लोकसभेत ३५ टक्के आरक्षण निश्चित केले जाईल. त्यामुळे महिलांना किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल, याबाबत स्पष्ट मांडणी केली जाईल.” *स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशस्वी अनुभव* स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. १९९४ पासून अनेक निवडणुका झाल्या. “माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार, प्रत्येक निवडणुकीत अधिक शिक्षित, सक्षम आणि जागरूक लोकप्रतिनिधी निवडून येतात. महाराष्ट्रात ओबीसी, एससी आरक्षणामुळे सर्व घटकांतील महिलांना चांगली संधी मिळाली आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी ‘पतीराज’ या आक्षेपावर स्पष्टीकरण देताना सांगितले, “कुटुंबातील व्यक्ती संवाद साधत असेल किंवा पक्षीय भूमिका घेत असेल, तरी अनेक महिला महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेविका स्वतंत्रपणे काम करतात. त्यांची स्वतःची वोट बँक तयार झाली आहे. ठाणे, कल्याणसारख्या ठिकाणी आरक्षण नसतानाही महिलांना सर्वसाधारण जागांवर संधी देण्यात आली आहे.” *आरक्षणाचे महत्त्व आणि विरोधकांना उत्तर* डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “पूर्वी आरक्षणाला ‘पांगळेपणाची खूण’ म्हणून पाहिले जायचे, पण आता ते समान संधीसाठी विशेष संधी म्हणून स्वीकारले जाते. सोशल मीडियामुळे चारित्र्यहनन, कौटुंबिक हिंसा, बदनामी यांची भीती महिलांना राजकारणापासून दूर ठेवते. आरक्षणामुळे राखीव संधी मिळाल्याने ‘महिला रेल्वेच्या राखीव डब्याला जसा अग्रक्रम देतात’ त्या प्रमाणे त्यांना आरक्षणामुळे सुरक्षित वाटेल.” महिला सुरक्षितता, शिक्षण, रोजगार, बचत गटांसोबत पीडित महिलांना भेटणे, कायद्याची अंमलबजावणी, पाणी-विकास-रस्ते-आरोग्य अशा मुद्द्यांवर महिलांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. “जेव्हा स्त्रियांची संख्या वाढते, तेव्हा भाषा बदलते आणि सार्वजनिक वाहतूक, मतदारसंघातील दळणवळण सुरक्षित होण्याकडे लक्ष दिले जाते,” असे त्यांनी नमूद केले. *मतदानात महिलांची वाढती भागीदारी* “महिलांची मतदानाची टक्केवारी तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांत वाढली आहे. त्यांच्यात जागृती वाढत आहे. हे विधेयक राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे,” असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी महायुती सरकारचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एनडीएचे पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांना योग्य सूचना दिल्याचेही त्यांनी नमूद केले. *पंतप्रधान मोदींच्या इच्छाशक्तीचे कौतुक* “१९९६ पासून ३० वर्षे हे बिल अडकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती दाखवली. २०३० पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सनुसार ५०-५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व हवे. हे प्रागतिक विधेयक आहे. संपूर्ण भारतातील प्रत्येक घरातील स्त्रीचे लक्ष याकडे आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. असंघटित क्षेत्रातील महिलांच्या जीवनातही बदल घडवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. गोऱ्हे यांनी या विधेयकाचे मनापासून स्वागत केले आणि महाराष्ट्रातील महिला कार्यकर्त्यांसह सर्व महिलांना या संधीचा उपयोग करून सुप्रशासन आणि सुरक्षित समाज घडवण्याचे आवाहन केले. ------

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

maratinews24.com

मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शासन-अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांमधील अध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मागणी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे मंत्री मा. ना. हसनजी मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय पोषण माहनिमित्त भोरमध्ये बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन – सविस्तर बातमी

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागांतील एकूण १६ आयुर्वेद आणि ३ युनानी शासन-अनुदानित महाविद्यालयांमध्ये शेकडो शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व संस्थांना शासनाकडून शंभर टक्के आर्थिक अनुदान मिळते. तरीदेखील आजपर्यंत या संस्थांना महाराष्ट्र सेवा नियम किंवा शासनमान्य Grant-in-Aid Code लागू करण्यात आलेला नाही. या दुर्लक्षामुळे अनेक कर्मचाऱ्यांना न्याय्य सेवा नियमांचा लाभ मिळालेला नाही आणि परिणामी, वारंवार न्यायालयीन वाद निर्माण होत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी याबाबत पुढे म्हटले आहे की, शासनमान्य पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका आणि वेतन नोंदींचे लेखापरीक्षण वर्ष २००० पासून आजपर्यंत झालेले नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि अन्यायकारक असून तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी शासन अनुदानित आयुर्वेद आणि युनानी संस्थांसाठी महाराष्ट्र सेवा नियम किंवा शासनमान्य Grant-in-Aid Code तत्काळ लागू करणे, सर्व अध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका व वेतन नोंदींचे शासनमान्य प्राधिकरणामार्फत नियमित लेखापरीक्षण करणे, तसेच या विषयावर आयुष संचलनालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत एक समन्वय समिती स्थापन करून कालबद्ध कार्यवाही करणे अशी पावले शासन स्तरावर उचलण्याची मागणी केली आहे .

डॉ. गोऱ्हे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या न्याय्य मागण्यांचा विचार होऊन सकारात्मक निर्णय झाल्यास आयुर्वेद आणि युनानी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शासनाच्या पारदर्शक व न्याय्य कारभाराला बळकटी मिळेल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×