Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

बारामतीतील शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद संस्थांना स्व. अजित (दादा) पवार यांचे नाव

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी 681 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचा शासन निर्णय जारी

marathinews24.com

बारामती – वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बारामती याचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात आले आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती आणि शासकीय आयुर्वेद रुग्णालय, बारामती यांचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती” असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून प्रारंभ – सविस्तर बातमी

शासन निर्णयात नमूद केल्यानुसार, स्वर्गीय अजित (दादा) अनंतराव पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून कार्य करताना राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविणे तसेच ग्रामीण भागात तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार करणे यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.

त्यांच्या पुढाकारामुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासाला लक्षणीय गती मिळाली. वैद्यकीय शिक्षणाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यामध्ये या संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे शासनाने नमूद केले आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×