Breking News
स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबारघरफोडीप्रकरणी आरोपीला अटक, बंडगार्डन पोलिसांची कामगिरीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादनरिक्षावर झाड कोसळून प्रवाशी जेष्ठ महिला ठारनागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध – पोलीस आयुक्त अमितेश कुमारपुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाईशिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभपर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५ ’चे १ जून रोजी आयोजनबँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली १२ लाखांचा गंडा

ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे प्रसंगावधान; जैनकवाडीतील पाण्याचा अडथळा दूर करुन मार्ग केला मोकळा

ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे प्रसंगावधान; जैनकवाडीतील पाण्याचा अडथळा दूर करुन मार्ग केला मोकळा

सांडव्यातील अडथळा दूर करुन पाण्याचा मार्ग मोकळा केल्याने मोठा अनर्थ टळला

marathinews24.com

बारामती – तालुक्यात दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जैनकवाडी पाझर तलाव पूर्ण भरून धोक्याची पातळी निर्माण झाली होती, प्रसंगावधान राखत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांडव्यातील अडथळा दूर करुन पाण्याचा मार्ग मोकळा केल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी दिली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी – सविस्तर बातमी 

स्थानिक शेतकऱ्यांनी सांडव्यातून पुढे जाण्यासाठी ३ फूट उंच रस्ता केला होता. त्यामुळे पाणी बाहेर पडण्यासाठी अडचण होत होती. तलावात पाण्याची पातळी खूप वाढू लागल्याने तलाव फुटण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी सपंर्क साधला. त्यावर ग्रामपंचायत अधिकारी अतुल गरगडे यांनी जेसीबीद्वारे अडथळा दूर केला. यामुळे ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीर, सुमारे ५० घरे आणि परिसरातील शेतजमिनी, शेतमाल, घरासोबतच पशुधनाचे नुकसान टाळता आले, अशी माहिती डॉ. बागल यांनी दिली आहे.

इंदापूरमधील चिखलीत प्रशासनाला युवकांची साथ

चिखली (ता. इंदापूर) या गावात बारामती- कळंब -बावडा मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यावेळी तेथे नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, ग्राम महसूल अधिकारी गोरख बारवकर, स्थानिक ग्राम महसूल सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच व गावातील युवकांनी सदर बाधित कुटुंबे जिल्हा परिषद शाळा येथे स्थलांतरित केली. रस्ता बंद झाल्यामुळे तेथून जाणारे अंदाजे २०० प्रवाशांची राहण्याची व जेवणाची सोय संबंधित सरपंच व गावातील नागरिकांनी केली.

२३ ते २५ मे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे निरा नदी तसेच ओढ्यांना पूर आला. त्यामुळे ओढे व नदीलगत लोकवस्तीमध्ये पुराचे पाणी अचानक घरामध्ये घुसून अंदाजे ५० गावांमधील १ हजार ७५५ कुटुंबे बाधित झाली. सदरची कुटुंबे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.
त्यासाठी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डोईफोडे, सर्व महसूल मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्राम महसूल सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील यांच्या मदतीने काम करण्यात आले.

जांब येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन मजुरांची तेथील पोलीस पाटील व नागरिकांनी अथक परिश्रम करून सुटका केली आहे. निरवांगी येथे निरा नदीकाठी असलेल्या नंदिकेश्वर मंदिरातील एका वृद्ध व्यक्तीची सुटका केली. ही कुटुंबे बाहेर काढताना ग्राम महसूल अधिकारी व पोलीस पाटील यांनी स्पीड बोट वापरून जीवावर उदार होऊन धैर्याचे काम केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top